Description
'अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू... अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे... अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा... अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो... या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे. पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक - प्रामाणिकही, सुंदरीही..... '