Description
मन म्हणजे काय? कुठे असते ते? कसे घडते ते? काय असते मनात? काय चालते मनात? मनाचे आरोग्य म्हणजे नेमके काय? कसे राखायचे हे आरोग्य? कसे रोखायचे औदासीन्य वा स्किझोफ्रीनियासारखे मनोविकार? काय असतात मनोविकारांवरचे उपचार? मनाचा अन् व्यक्तीच्या स्वभावाचा काय संबंध? कसा जडतो संबंध व्यक्तीच्या मनाचा अन् समाजमानसाचा? समाजातल्या रूढी अन् अंधश्रद्धांचा आणि मनाचा एकमेकांवर काय परिणाम होतो? अशा आपल्याही मनात उठणा-या अनेक प्रश्नांची एक मनोविकारतज्ज्ञ आणि एक हाडाचा सामाजिक कार्यकर्ता अशा दोघांनी मिळून केलेली उकल