Description
"प्रेषितांनी निर्माण केलेले हे (इस्लामचे) जागतिक आंदोलन त्यांच्या अनुयायांनी विजयी मोहिमांच्या लाटांवर स्वार होऊन, जगाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत नेले. शतकानुशतके परस्परांत लढाया व रक्तपात करणा-या टोळ्यांची मायभूमी असलेला अरबस्थान अचानक चेतना निर्माण होऊन समान उद्देशाने पेटून उठला... जगाच्या कानांकोप-यात नेण्यासाठी त्यांनी इस्लामचा ध्वज हातात धरला... तीस वर्षांच्या आत - आदर्श खलिफांच्या काळात - त्यांनी प्रचंड साम्राज्य उभे केले, जे तेराशे वर्षे सातत्याने प्रयत्न करूनही रोमनांनी उभारलेल्या प्रचंड साम्राज्यापेक्षाही विशाल होते.’’ - न्या. अमीर अली ‘‘ "हे ऐकून कोणीही अगदी चकित होऊन जाईल की, अरबस्थानच्या वाळवंटातून निघालेल्या व नव्या धर्मोत्साहाने पेटून उठलेल्या काही भटक्या टोळ्यांनी, विश्वास बसणार नाही इतक्या द्रुतगतीने, प्राचीन काळातील दोन महाबलाढ्य साम्राज्यांना जमीनदोस्त केले... केवळ तीस वर्षांच्या आत प्रेषित मुहंमद यांच्या अनुयायांनी इस्लामचा विजयी ध्वज एका टोकाला भारताच्या वेशीवर, तर दुस-या टोकाला अटलांटिकाच्या किना-यावर नेऊन उभा केला... (त्यांच्याकडून) दहा वर्षांच्या आत पराभूत होण्यासाठीच जणू सुमारे एक हजार वर्षे रोमनांच्या सैन्याला यशस्वी टक्कर देत पर्शियन साम्राज्य (तोवर) जिवंत राहिले होते.’’ - मानवेंद्रनाथ रॉय ‘‘इस्लामला मिळालेला हा विजय (जगातील) सर्व चमत्कारांतील महत्तम चमत्कार होय.’’ प्रा. मसुदुल हसन / मानवेंद्रनाथ रॉय