Description
'‘...कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो...मानवी इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला झाला होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही न्हाऊन निघालो होतो...नव्या युगाची सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला मनातून खात्री वाटू लागली होती. ...ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी, त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक... आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा गट...अशी सर्व पार्श्र्वभूमी असल्यामुळे आम्ही त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे समजत होतो.