Description
'वर्धमान महावीर हे जैनांचे चोविसावे तीर्थंकर. जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार झाला, तो महावीरस्वामींच्या जीवनकालात. वर्धमानांनी उपदेशिलेली जीवनप्रणाली आणि तत्त्वे आजच्या घडीलाही यथार्थपणे लागू पडतात. ऐहिक समृद्धी, मानसिक सुखशांती अन् आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी त्याचबरोबर आजच्या काळातील प्रदूषण, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा, विस्कटणारी नाती अशा अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी भगवान महावीरांची शिकवण नितांत उपयोगी ठरते. या शिकवणीचे सार सांगणारे आणि आजच्या काळातील त्याचा अन्वयार्थ समजावणारे वर्धमान ते वर्तमान