Description
पाण्यातील मासे, सळसळणारे नाग-साप ते हिंस्र वाघापर्यंत त्याला बालपणापासून कुतूहल. तो त्यांचं निरीक्षण करत गेला. त्यांच्यावर प्रयोग करत गेला. यातून विचार सुरू झाला. वन्यजिवांपासून माणसांचं संरक्षण कसं करायचं? माणसाच्या आक्रमणापासून वन्य जीवन कसं वाचवायचं? दोन्ही प्रश्नांना त्यानं कृतीशील उत्तरं शोधली. त्याच्या खिशात दमडी नव्हती, पण जबरदस्त जिद्द होती. कष्टांची फिकीर नव्हती. प्राणांची बाजी लावायची तयारी होती. त्याच्या कामातील प्रामाणिकपणामुळे असंख्य गावकरी, निष्णात डॉक्टर, वनअधिकारी, कार्यकर्ते भोवती एकत्र आले. कार्याचा ओघ अखंड सुरू राहिला. अशा जगावेगळ्या माणसाबरोबर रानावनात फिरून उलगडलेला त्याचा जीवनकार्यपट. मृणालिनी चितळे यांच्या लेखणीतून सिद्ध झालेले पुस्तक.