Description
आज प्रत्येकालाच कल्पनेच्या उपयुक्तेत रस आहे, खुद्द कल्पनेत नाही. अरे, मोहरीएवढं बी वटवृक्षाचं. पण उद्याच्या अजस्त्र वटवृक्षाचे सगळे गुणधर्म असतात त्याच्यात. पुढच्या विशाल वटवृक्षात सर्वांनाच रस, पण बीजात नाही; मग वटवृक्ष मिळावा कसा? बीजात आनंदानं रस घेणारे वेडे फार थोडे. चंगळवादाच्या वावटळीत जीव धरून असतील कुठं कुठं! पण समाजाला आनंदानं जगता यावं, अशी व्यवस्था निर्माण करणं हेच जर आपलं उद्दिष्ट असेल, तर या वेड्यांच्या आनंदाला अपरंपार महत्व आहे.