Description
पद्मभूषण माधव गाडगीळ म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! निसर्गप्रेम हा माधव गाडगीळांचा श्वास अन् ध्यास. गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या सा-यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे माधव गाडगीळ. साहित्यिक अंगाने अन् ललित शैलीने नटलेले या निसर्गवैज्ञानिकाचे आत्मवृत्त बनले आहे एक अद्भुत सफर. केवळ निसर्गप्रेमी वा निसर्ग-अभ्यासकांनाच नव्हे, तर भवतालाबद्दल कुतूहल असणार्या प्रत्येकाला एका वेगळ्या विविधरंगी जगाचे दर्शन घडवणारी जीवनसफर