Description
संवादाचा सुवावो ही काही चटपटीत मांडणीची आणि चविष्ट माहितीची वर्तमानपत्री मुलाखत नाही. हा अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा सर्जनशील वैचारिक संवाद आहे. प्रश्न विचारणारा आणि उत्तरे देणारा दोघेही सर्जनशील लेखक आहेत आणि ते प्रामाणिकपणे आपल्या विचारांचा शोध घेत आहेत, त्यांचा अर्थ समजून घेत आहेत. त्यांनी घेतलेल्या या शोधाचा वाचक म्हणून मागोवा घेत असताना आपण आपल्याही विचारांचा, दृष्टिकोनांचा शोध घेऊ लागतो, पापणी जागी ठेवून स्वत:कडे पाहू लागतो. याहून अधिक काय हवे? मंगेश पाडगावकर (प्रास्ताविकातून)