Description
'आजमितीस भारत हा तरुणांचा देश म्हणून मिरवतो आहे, पण आणखी तीस-पस्तीस वर्षांनी तो वृद्धांचा देश होऊ लागेल. त्या वेळी त्या वृद्धांचे संगोपन करायला देशाने काही व्यवस्था आधीपासूनच विकसित करायला हव्यात, की नकोत? या व्यवस्था विकसित करायच्या, तर त्यासाठी लागणारा पैसा आजच्या तरुणांकडून कररूपात घ्यायला हवा. पण आजचे खूपसे तरुण बेरोजगार असतील, तर ते स्वत:च्या आणि इतरांच्याही वृद्धसंगोपनाची तरतूद कशी करणार? प्रश्न जटिल आहे. शिवाय तो फक्त भावनिक, कौटुंबिक नाही, तर राष्ट्रीय आणि आर्थिकही आहे. या जटिल प्रश्नावर एक उतारा म्हणजे आजचे वृद्धच आजच्या तरुणांसाठी रोजगार निर्मितीचे निमित्त होऊ शकतात. त्यासाठी गरज आहे वृद्धसंगोपनाकडे केवळ भावनिक आणि मानवतावादी दृष्टिकोनातून नाही, तर आर्थिक दृष्टिकोनातूनही बघण्याची. कसे, ते समजावून सांगणारे आगळेवेगळे पुस्तक.'