Description
रवींद्र पिंगे! गेली ५० वर्षं को-या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक. अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर. सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण. परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झ-याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं. रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, ‘सर्वोत्तम’ नजराणा तुम्हां वाचकांसाठी—