Description
'कोर्टाची पायरी चढणं नको, असंच बहुसंख्य महिलांना वाटत असतं. पण आता काळ बदललाय. जिथं कधीकाळी सतीबंदीचा कायदाही बिचकत करावा लागला होता, तिथंच आज ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ला कायद्याची मान्यता द्या, असा दबाव येतोय. जिथं स्वत: जन्माला घातलेल्या मुलावरसुद्धा बाईचा कायदेशीर अधिकार नव्हता, तिथंच आज ‘सरोगसी’द्वारे मूल मिळवण्याचा अधिकार हवासा वाटतो आहे. स्त्रीचा, तिच्या आणि समाजाच्याही मानसिकतेचा हा लांबलचक प्रवास समजून घेण्यासाठी आणि कायद्याबद्दलची किमान साक्षरता मिळवण्यासाठी सर्व महिलांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.