Description
सत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो.
सत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे - त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत.