Description
मराठवाड्यातला बीड जिल्हा. त्यातला खोकरमोहासारखा ग्रामीण भाग. त्या भागातल्या छप्परबंद समाजाच्या कष्टकरी, गरीब कुटुंबात जन्मलेला मुलगा. काटेरी, कष्टप्रद अन् समस्या-आव्हानांनी भरलेल्या आयुष्याचा धकाधकीचा प्रवास पार करत या मुलानं यशोभरारी घेतली. या भरारीसाठी त्याच्या पंखात बळ भरलं त्याच्या आईवडलांनी, नातेवाइकांनी आणि सगळ्यात जास्त गुरुजनांनी, गावातल्या वडीलधऱ्या माणसांनी. गावातल्या पुढे जाणाऱ्या प्रत्येक मुलाला ताकद पुरवण्याची ही परंपरा खोकरमोहानं वर्षानुवर्षं जपली, कायम राखली. हा सगळा व्यक्तिगत अन् सामूहिक प्रवास रेखाटणारं – सगळ्या तरुणाईसाठी मोटिव्हेशनल ठरणारं – शून्यातून शंभराकडे