Description
निसर्गातील कोणत्याही जातीला वाचविण्याचा खात्रीलायक मार्ग माणसाला सापडणं ही जागतिक महत्वाची गोष्ट् आहे. कारण निसर्गातले जीव माणूस नेहमीच नष्ट करीत असतो. एखादा नवीन जीव निर्माण करणं मात्र त्याला शक्य होत नाही. तेव्हा आहेत ते सर्व जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणं एवढंच त्याच्या हाती उरतं. सायबेरिया ते भरतपूर असा लांब पल्याचा परतीचा प्रवास करणा-या देखण्या क्रौंच पक्षांना वाचवण्यासाठी त्यांचा मागोवा घेत भारत, अमेरिका आणि रशियातील पक्षीतज्ञांनी केलेल्या अथक प्रयत्नांची एका निसगप्रेमी, संवेदनाशील मनाने केलेली टिपणे.