Description
शहरे मुळातच गुंतागुंतीची, विक्षिप्त आणि बेभरवशाची. ज़मीन, उद्योग आणि माणसे या तीन घटकांमधून घडणारी, घडता घडता बिघडणारी आणि बघता बघता सुधारणारीही. आजची आपली शहरे म्हणजे गर्दी, बकालपणा आणि असुरक्षितता यांच्या विळख्यात सापडलेल्या बेशिस्त वस्त्याच. त्यांना पुनश्च: रुळावर आणण्यासाठी मिळाली आहे. जादूची छडी स्मार्ट तंत्रज्ञान ! आता गरज आहे ती स्मार्ट नागरिक, स्मार्ट प्रशासन, द्रष्टे नेतृत्व आणि प्रबळ सामूहिक इच्छाशक्ती यांची. हीच स्मार्ट तंत्रज्ञानाची छडी वापरून अनेक शहरे स्मार्टपणाच्या वाटेवर खूप पुढे निघून गेली आहेत. ‘त्यांचे’ अनुभव आणि ‘आपली’ नागर वैशिष्टये यांचे भान ठेवून आपल्याला स्वत:च्या वाटा शोधायच्या आहेत. हे कसे साधायचे, याचा मंत्रजागर म्हणजे स्मार्ट सिटी सर्वांसाठी.