Skip to product information
1 of 2

Smrutichitre (स्मृतिचित्रे) By by Laxmibai Tilak

Smrutichitre (स्मृतिचित्रे) By by Laxmibai Tilak

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की...

Regular price Rs. 400.00
Sale price Rs. 400.00 Regular price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 400.00
View full details

मराठी सारस्वतात अमर राहणारी जी काही थोडी पुस्तके आहेत त्यात 'स्मृतिचित्रे' चा समावेश होतो. आत्मचरित्रात तर इतके पारदर्शी, भावपूर्ण व हृदयम आत्मचरित्र दुसरे नाहीच. प्रसिद्ध समिक्षक माधव मनोहर म्हणतात की ' हा ज्ञानेश्वरीजवळ ठेवावा असा ग्रंथ आहे.' स्मृतिचित्रे हे केवळ आत्मचरित्र नाही, तर तो १८६० ते १९२० या कालखंडातील सामाजिक इतिहास आहे. या काळातील सामाजिक बदलांचेही चित्रण यात आढळेल. यातील भाषा ओघवती व अकृत्रिम आहे. त्यावर इंग्रजीचा छाप नाही. अगदी बाळबोध मराठी किती गोड असू शकते ते या पुस्तकातून कळेल. हे लिखाण हृदयातून उत्स्फूर्तपणे बाहेर आलेले आहे, यामुळे त्यात ताजेपणा व जिवंतपणा आहे. लक्ष्मीबाईंचे जीवन एक प्रकारे अद्भुतरम्य व तसे जगावेगळे आहे. या रम्यतेचे, अद्भुततेचे प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या सोप्या व शैलीदार भाषेने वाचकांच्या डोळ्यासमोर चित्रपटाप्रमाणे उभे राहते. आत्मचरित्र म्हणजे आपले दोष लपवणे व दुसऱ्याचे दाखवणे असा प्रकार असतो. तो मात्र येथे मुळीच सापडणार नाही. दोषांचे दर्शन नाही व कसलीच लपवाछपवी येथे नाही, किंवा कोणावर आरोप केलेले नाहीत. कोणतेही प्रचलित शिक्षण न घेता केवळ कठीण परिस्थितीशी लढा देऊन मन किती सुसंस्कृत होऊ शकते याचे चित्र या पुस्तकात आढळते. आपल्या जीवनाकडे संपूर्ण निर्विकार मनाने पाहण्याची लक्ष्मीबाईंची दृष्टी या पुस्तकात आढळून येईल. इतकेच नव्हे तर अनासक्त बुद्धीने कर्तव्य करीत राहण्याची निष्ठा आणि काळोखातही सोनेरी किनार लावणारी असामान्य विनोदबुद्धी त्यांच्या ठिकाणी होती. यातील विनोद कोणालाच बोचणारा नाही. किंबहुना स्वत:वरच केलेला आहे. प्रसन्न व गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल.