Skip to product information
1 of 1

Sundarkand | सुंदरकांड By Goswami Tulsidas

Sundarkand | सुंदरकांड By Goswami Tulsidas

गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ रचण्यास सुरुवात केली आणि तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि 26 दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाले.जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भुत ग्रंथ लाभला....

Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Sub total

Rs. 180.00
View full details

गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ रचण्यास सुरुवात केली आणि तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि 26 दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाले.
जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भुत ग्रंथ लाभला. त्यातील भाषासौंदर्याने हा ग्रंथ उजळून निघाला.
‘रामचरितमानस’मधील अनेक दोहे हे सहजपणे आजही ओठांवर येत असतात.
रामायणाचे निरूपण करताना अगदी सोप्या भाषेत तुलसीदासांनी भारतीय जीवनपद्धतीची व्याख्याच जणू लोकप्रिय केली.
गोस्वामी तुलसीदासरचित ‘रामचरितमानस’चे कथानक हे महर्षी वाल्मीकी यांच्या ‘रामायण’ या रचनेवर आधारित आहे.
‘रामचरितमानस’ची सात कांडांत (अध्याय) विभागणी केली गेली आहे.
‘सुंदरकांड’ हा ‘रामचरितमानस’चा एक प्रमुख अध्याय आहे.
महर्षी वाल्मीकीरचित संस्कृत रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून हा ग्रंथ रचला गेला असून, हा अध्याय आपल्या मायबोलीत या पुस्तकरूपाने आपल्यासमोर आलाय.
‘सुंदरकांड’ अतिशय रसपूर्ण आणि मोहक आहे, ज्यामध्ये हनुमंतांची स्तुती करताना त्यांच्या लीला, पराक्रम, प्रतिमा विश्लेषण, घटनांची सुरेख गुंफण, चपखल शब्दांत दोहे आणि चौपाईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात.
हनुमंतांचे लीलावर्णन एवढंच साध्य न ठेवता यामध्ये ज्ञान, कर्म, नीती-अनीती आणि भक्तीचीही प्रचीती येते.
हा अनुवाद वाचकांना नक्कीच भावयुक्त भक्तीची – आनंदाची अनुभूती देणारा आहे.