Description
उभयगानविदुषी डॉ. श्यामला जी. भावे. हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन्ही अभिजात संगीतशैलींमध्ये पारंगत ख्यातकीर्त गायिका. पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, वडील आचार्य गोविंदराव भावे अन् आई लक्ष्मीबाईंची संगीतसाधनेची परंपरा पुढे नेणा-या समर्थ वारसदार. गायन-वादनापासून नृत्यापर्यंत विविध कलाक्षेत्रांत मुद्रा उमटवणा-या प्रतिभावान कलाकार. भारतीय संगीताच्या दोन्ही संगीतशैलींमध्ये अप्रतिहत संचार करणा-या या उभयगानविदुषीची सुरेल गानयात्रा