Description
‘शिष्यात् इच्छेत् पराजयम् ।’ प्रिया निघोजकर या माझ्या शिष्येने त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या साहित्यसंशोधनाला दिलेले हे ग्रंथरूप मराठी साहित्याचे अभ्यासक, संशोधक आणि वाचक या सर्वांसाठी मौलिक ठरणार आहे. विद्यार्थी, विषय आणि मार्गदर्शक ह्या त्रिवेणी संगमातून उत्तम लेखन होऊ शकते, याचे हे ग्रंथरूप आदर्श उदाहरण आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार आणि साक्षेपी समीक्षक असलेल्या सरदेशमुखांच्या साहित्याची एक नवी ओळख ह्या ग्रंथातून वाचकांना होईल. डॉ. सु. रा. चुनेकर '