Description
मुलं आणि पालक या दोघांनाही डोळ्यांसमोर ठेवून केलेलं हे खुसखुशीत लेखन आहे. एकांकिका, शॉर्ट फिल्म किंवा स्किटच्या स्वरूपात या नाटिका सादर होऊ शकतात. मुलांचे विषय हाताळणारं हे लेखन केवळ मनोरंजक नाही, काही नाटिका बोध घेण्याजोग्याही आहेत. मुख्य म्हणजे रंगमंच, अभिनय, कॅमेरा, लघुपट, प्रहसन अशा अनेक गोष्टींची माहिती आणि अनुभव मुलांना यांतून मिळू शकतो. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या सहा नाटिकांचं संकलन -