Description
एका व्यक्तीची विलक्षण कथा.
त्याच्याविषयीच्या दंतकथेने त्याला देव बनवून टाकले.
ख्रि.पू. १९०० या काळात आधुनिक भारताची ओळख सिंधु संस्कृती अशी होती. त्या काळातील रहिवासी त्याला मेलुहाची भूमी म्हणत होते. कित्येक शतकांपूर्वी प्रभू रामाने या परिपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली होती.
पवित्र सरस्वती नदीचे पात्र हळूहळू कोरडे होऊन लुप्त झाल्यामुळे एके काळची स्वाभिमानी संस्कृती आणि सूर्यवंशींचे साम्राज्य धोक्यात आले. पूर्वेकडे असलेल्या चंद्रवंशींच्या साम्राज्याच्या प्रदेशातून त्यांच्यावर अनेक विघातक दहशतवादी हल्लेही झाले. याशिवाय आणखी वाईट गोष्ट म्हणजे चंद्रवंशींनी नागा लोकांशी हातमिळवणी करून हे हल्ले केल्याचाही सूर्यवंशीचा समज झाला. नागा जमात ही शारीरिकदृ।ट्या अपंगत्व किंवा विचित्रपणा असलेल्या लोकांची बहिष्कृत ठरलेली जमात होती.
त्यांच्याकडे वैयक्तिक संरक्षणाची आणि लढाईची उत्तम कौशल्ये होती.
त्यावेळी सूर्यवंशींना एका प्राचीन दंतकथेचाच आधार होता. ज्या वेळी दुष्टांची दुष्कृत्ये अखेरच्या सीमेपर्यंत पोहचतात, सारे काही संपल्यासारखे वाटू लागते, ज्यावेळी शत्रूचा विजय झाला असे वाटू लागते, त्यावेळी त्या युगाचा नायक अवतरतो.
तिबेटहून स्थलांतरित म्हणून आलेला धसमुसळा, आडदांड शिव हाच तो नायक होता? पण मुळातच नायक बनण्याची त्याची इच्छा होती का?
कर्तव्य आणि प्रेम यांमुळे अचानक आपल्या नियतीकडे ओढला गेलेला शिव सूर्यवंशींच्या सुडासाठीच्या युद्धाचे नेतृत्व करून दुष्टांचा संहार करेल का?
शिवाच्या जीवनावरील तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक आहे. आपल्या कर्मामुळे एका साध्या माणसाने स्वतःला महादेव म्हणजे देवांचाही देव बनवले, त्याची विस्मयचकित करणारी कथा!