Description
साने गुरुजी लिखित तीन मुले मंगा, माधुरी आणि बुधा या तीन पात्रांवर लिहलेले एक प्रेम कहाणी आहे. लहानपणापासून ते तिघंही एकमेकांबरोबर खेळतात. मंगा व मधुरी थोडे गरीब असतात, पण बुधा श्रीमंत असतो. माधुरी दोघांना आवडते. तिघेही मोठे होतात नंतर मधुरी व मंगा लग्न करतात. त्या दोघांचा संसार सुरु होतो. पण बुधा नेहमी एकटाच असतो. पण गरिबी मंगाला खात असते. मंगाला हे गरिबी अजिबात पटत नाही आणि तो दूर करण्यासाठी आणि थोडे पैसे कमवण्यासाठी दूर व्यापार करण्यासाठी जातो. पण खूप दिवसानंतरही त्याचा काहीच निरोप येत नाही तर माधुरी खिन्न होते.