Description
रंगाभिनयाचे मध्यवर्ती अंग म्हणजे वाचिक अभिनय. तो कसा करावा, हे सांगणारे हे महत्त्वाचे पुस्तक. पूर्वार्धात श्वास नियंत्रण, स्वरयंत्राचे म्हणजे पर्यायाने आवाजाचे नियंत्रण करण्याबद्दलचे विवेचन आहे, जोडीला काही व्यायाम सांगितले आहेत. उत्तरार्धामध्ये कलेची साधना करण्याची गरज पटवून दिली आहे आणि मराठी नाट्यसृष्टीतल्या निवडक उतार्यांची चर्चाही केली आहे. वाचिक अभिनयामुळे नटसम्राट ठरलेल्या एका व्यासंगी अभिनेत्याने स्वानुभवाच्या आधारे केलेले मौलिक मार्गदर्शन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे.