Description
भारतीय रंगभूमीवर महत्त्वाचे योगदान केलेल्या पंधरा स्त्री-रंगकर्मींना वीस प्रश्नांची एक प्रश्नावली पाठवण्यात आली. दिशादर्शनाच्या हेतूने प्रतिभावंत नाटककार महेश एलवुंâचवार यांनी पाठवलेल्या या वीस प्रश्नांची उत्तरे देताना या सर्जनशील रंगकर्मींनी विविध मुद्द्यांवर सुस्पष्ट मते मांडली. या सगळ्या प्रश्नोत्तरांमधून रसिक वाचकालाही या साऱ्या रंगकर्मींच्या व्यक्तिमत्त्वाची अन् कर्तृत्वाची अनोखी ओळख होते. पंधरा कर्तबगार स्त्री-कलावतांच्या तीनशे वेगवेगळ्या उत्तरांचा मागोवा घेणारे... वीस प्रश्न !