Description
विज्ञान हा वर्तमानकाळाचा युगधर्म आहे. सा-या मानवी जीवनाचा तो आधारच आहे. विज्ञानाने सारे मानवी जीवन आमूलाग्र बदलले. केवळ एका विसाव्या शतकात हे साध्य झाले. एकविसावे शतक मानवी स्वरूपच बदलून टाकणार आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्येच विज्ञान हस्तक्षेप करेल. चंद्र-मंगळावर मानवी वसाहती होतील, आणि मानव सूर्यमालेबाहेर जाण्याची स्वप्ने पाहील. इंटरनेटद्वारे बुध्दिमान जागतिक मेंदू निर्माण होईल. नॅनो आणि बायो टेक्नॉलॉजी हे परवलीचे शब्द होतील. इन्फर्मेशन सुपर पॉवर्स अस्तित्वात येतील. 'इंटिलिजंट स्टेटस्' देशातील नागरिकांना एकात्म करतील. विज्ञानावर प्रभुत्व ही एक अटीतटीची स्पर्धा होईल. 'विज्ञान वेध' या प्रस्तुत पुस्तकात त्याची झलक दिसून येईल. भारताला मात्र या स्पर्धेत मागे राहून परवडणार नाही.