Description
विज्ञान ही संज्ञा सर्वांना परिचयाची असते. पण तत्वज्ञान म्हटले, की अंमळ बिचकायला होते. विज्ञानाचे तत्वज्ञान ही तर भानगड पूर्णच डोक्यावरून जाते. मात्र विज्ञानालाही जे स्पष्टीकरण मागते, पेचात पकडते, प्रश्न टाकते ते विज्ञानाचे तत्वज्ञान! विज्ञान जे गृहित धरते, निष्कर्ष काढते, दावे करते, ते तर्काच्या कसोटीवर तावून सुलखून घेण्याचे काम विज्ञानाच्या तत्वज्ञानाचे!! तत्वज्ञानाचा जागल्या हा विज्ञानातील गैरसमजाचे तण दूर करून वैज्ञानिक मांडणी अधिकाधिक लख्ख करतो. सर्व वैज्ञानिकांना आधारभूत ठरणारा हा इंग्रजी भाषेतील परिचयपर लघुग्रंथ मराठीत उपलब्ध करून देत आहोत. विज्ञानजगातात तो निश्चितपणे मोलाची भर घालेल.