Description
ज्याकाळी पर्यावरणशास्त्र किंवा इकॉलॉजी हा शब्दही रूढ व्हायचा होता, त्या काळापासून निसर्गरक्षणाच्या कामात गुंतलेला हा शास्त्रज्ञ. पन्नासहून अधिक वर्षांपूर्वी अमेरिकेत जीवशास्त्र व संगणकशास्त्राचे प्रगत शिक्षण घेऊनही तिथे न राहता ते मायभूमीला परतले. महाराष्ट्रातील देवराया असोत वा भारतातील हत्तींची मोजदाद असो, व्याघ्रप्रकल्प असो वा जैवविविधता सूची असो, डॉ.माधव गाडगीळांच्या मार्गदर्शनाशिवाय हे पुरे होऊच शकले नसते. विज्ञाननिष्ठ आणि तरीही कविमनाच्या शास्त्रज्ञाचे आवर्जून वाचावे, असे चरित्र.