Description
विठूमाउली बापरखुमादेवीवराऽ विठोऽ विठ्ठलाऽ किती किती हाकांनी फोडलेला टाहो ! कुणी त्याला भजतात, कुणी अभ्यासतात. कुणी त्याला पाहतात, कुणी गळामिठी घेतात, कुणी समचरणी माथा टेकतात, कुणी निव्वळ मनीचा भाव पोचवतात. आणि आपल्यालाही तो वेगवेगळ्या रूपांत भेटतो. कधी सखा, कधी राजकारणी, कधी आधार देणारा, तर कधी भ्रष्टाचारी व्यवस्थेचा प्रतिनिधी बनूनसुद्धा ! सुष्टापासून दुष्टांपर्यंत, भल्यापासून बु-यापर्यंत अवघ्या चराचरात भरून राहिलेला ‘तो’ - त्याचे दर्शन घडवणाऱ्या कविता विठोबा