Description
'विम्बल्डन टेनिसच्या जगतातील महायोध्दयांची रणभूमी. जगज्जेतेपदासाठी त्यांची चाललेली झुंज. विम्बल्डनच्या तृणांगणावर नुसते सामने रंगत नाहीत तर एक बेभान, भन्नाट विश्वच साकारतं. त्या तृणांगणावरच्या ओलसर हिरवाईची जादू भारावून टाकते. विम्बल्डनचा रोमहर्षक इतिहास, विजेत्यांच्या हर्षखेदाचे उदयास्त सांगता सांगता लेखक तुम्हाला नकळत नेऊन सोडतो विम्बल्डनच्या सेंटर कोर्टावर. एक टवटवीत टेनिसानुभव विम्बडनच्या तृणांगणावर '